नारळाचा हा छोटासा उपाय शनिवारी केल्याने दूर होऊ लागतात अडचणी
कलियुगात हनुमानाला सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जाते. यांच्या उपासनेने कुंडलीतील सर्व ग्रहदोष नष्ट होतात. विशेषतः शनीच्या साडेसाती आणि अडीचकीमध्ये हनुमानाचे उपाय भक्तांचे वाईट काळापासून रक्षण करतात. येथे जाणून घ्या, शनिदोषातून मुक्त करणारे काही खास उपाय.
शनिवारी करा नारळाचा हा उपाय -
प्रत्येक शनिवारी एक नारळ घेऊन एखाद्या हनुमान मंदिरात जावे. मंदिरात गेल्यानंतर हनुमानासमोर हे नारळ स्वतःवरून 7 वेळेस उतरवून घ्यावे. या दरम्यान हनुमान मंत्र ऊँ रामदूताय नम: या ऊँ महावीराय नमः चा जप करावा. त्यानंतर नारळ हनुमानासमोर फोडून अर्पण करावे. शनि दोष आणि अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
हनुमानाला अर्पण करा या वस्तू -
प्रत्येक शनिवारी हनुमानाला लाल वस्त्र, शेंदूर, चमेलीचे तेल, लाल फुल अर्पण करावे. त्यासोबतच हनुमान चालीसाचे पाठ अवश्य करावेत. या उपायाने सर्व प्रकारच्या अडचणींमधून मुक्ती मिळू शकते.
पिंपळाच्या पानावर श्रीराम लिहावे
शनिवारी पिंपळाची 11 पाने तोडून आणावीत. सर्व पानं अखंड असावेत, फाटलेले नसावेत. सर्व पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर हनुमान मंदिरात जाऊन सर्व पानांवर चंदनाने 'श्रीराम' लिहा. या पानांची माळ तयार करून हनुमानाला अर्पण करा.
मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा
दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर हनुमानासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दिवा मातीचा असल्यास जास्त शुभ राहील. दिवा लावल्यानंतर एकाग्र मानाने हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पाठ करावेत
नारळाचा हा छोटासा उपाय शनिवारी केल्याने दूर होऊ लागतात अडचणी
Reviewed by Hungerformoney
on
नवंबर 25, 2017
Rating:

कोई टिप्पणी नहीं